Pune : पुणे शहरातील 500 ड्रग्ज ‘पेडलर’ रडारवर; ड्रग्जच्या खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी गेल्या तीन ( Pune)  वर्षातील ‘ड्रग्ज पेडलर’ (ग्राहकांना किरकोळ स्वरूपात ड्रग्ज पुरवणारे) शोधले असून ते पेडलर आता रडारवर घेतले आहेत.प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत या पेडलरांना ड्रग्ज कोठून येतो याची साखळी शोधत ती पुर्णपणे उद्धस्थ करण्याचे काम गुन्हे शाखेने हाती घेतले आहे.

त्यायाठी  पुणे पोलिसांनी गेल्या तीन वर्षातील किरकोळ ड्रग्ज पुरवठादारांची यादी तयार केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर वॉच ठेवून त्यांच्याकडून साखळी मोडीत काढण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम युद्धपातळीवर तर चालणार आहेच, परंतु, मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवून छोट्या पेडलरांना कोण आणि कोठून ड्रग्ज देतो, याचीही पाळेमुळे शोधली जाणार आहेत, सव्वा तीन वर्षातील अशी तब्बल  535  जणांची यादी तयार झाली आहे. त्यात काहीजण नव्याने या यादीत समावेश झालेली आहेत. त्यांच्यावरही पोलिसांची नजर असणार आहे.

Pimpri : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

पुणे पोलिसांनी 2021 ते 2024 या कालावधीत शहरात केलेल्या कारवाईत तब्बल 50 महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ड्रग्जचा पुरवठा होत  असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच 30 परदेशी नागरिकांना देखील पोलिसांनी यादरम्यान अटक केली आहे. त्यांच्यावर पोलीस नजर ठेवून ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.