Pune : पब, रुफटॉफ व टेरेस हॉटेलसाठी आजपासून 31 मार्च पर्यंत 144 कलम लागू

एमपीसी न्यूज – नागरिकांकडून येणाऱ्या सततच्या ( Pune) तक्रारी व नियमांचा असणारा अभाव यामुळे पुणे पोलिसांनी शहरात असणारे पब, रुफटॉप व टेरेस हॉटेल यांच्यासाठी आज (मंगळवारी) मध्यरात्री पासून ते 31 मांर्च पर्यंत सीआरपीसी 144 कलम लागू केले आहे.

Pune : पुणे शहरातील 500 ड्रग्ज ‘पेडलर’ रडारवर; ड्रग्जच्या खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश

शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची नुकतीच बैठक झाली आहे.

यात पोलिसांनी 28 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या.त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत पुणे पोलिसांनी हे कमल लागू केले आहे. कायदा व न्यायालयीन आदेशांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत.

पोलीस आयुक्तांनी अमितेश कुमार यांनी याबाबात पत्रकारपरिषद घेत पब , रुफटॉफ हॉटेल याबाबत कडक कारवाई करणार असल्याचेही सांगितले होते. कलम लागू केले असले तरी नागरिकांना यासंदर्भातील त्यांच्या तक्रारी ई-मेल आयडी [email protected] नोंदवता येणार ( Pune)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.