Pimpri : आंद्रा धरणातील पाणी कमी झाल्याने चिखली परिसरात पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून  30 ते 35 एमएलडी पाणी ( Pimpri ) कमी मिळत असल्याने चिखली परिसरात पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत साेडून निघोजे बंधाऱ्यातून दाेन पंपाद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंद्रा धरणातून 40 ते 45 एमएलडीच पाणी मिळत आहे. त्यामुळे साधारण 30 एमएलडी पाण्याची तूट निर्माण हाेत असल्याने च-हाेली, माेशी, डुडुळगाव, भाेसरी, दिघीसह आदी परिसरातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

Pune : पब, रुफटॉफ व टेरेस हॉटेलसाठी आजपासून 31 मार्च पर्यंत 144 कलम लागू

आंद्रा धरणातून पाणी कमी येत असल्याबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला. ठरलेल्या काेट्यानुसार पाणी साेडण्यात येत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जात आहे. धरणातून इंद्रायणी नदीत साेडल्यानंतर मध्येच पाणी जास्त उचलण्याचे प्रमाण वाढले की काय अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे.

निघाेजे बंधा-यात पाण्याचा पुरेसा साठा हाेत नसल्याने दाेन पंपाऐवजी एकाच पंपाव्दारे पाणी उपसा केला जात आहे. आंद्रा धरणातून कमी पाणी मिळत असल्याने महापालिकेने पुन्हा 30 एमएलडी पाणी घेण्यास पुन्हा सुरूवात केली आहे.  यावर ताेडगा काढण्यासाठी आयुक्तांबराेबर बैठकीचे आयाेजन करण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी ( Pimpri ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.