Nigdi : प्राधिकरणात रंगले प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक

एमपीसी न्यूज –  प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित, प्रा. वसंत कानेटकर लिखित,  प्रेमाचे गहिरे रंग उलगडणारे ( Nigdi ) अजरामर नाटक ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे संघाच्या ज्येष्ठ कलाकारांनी मनोहर वाढोकर सभागृहात सादर केले.

नाटकाला  नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला . या नाटकाचा प्रयोग अत्यंत नेटका, बहारदार आणि एखाद्या व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा झाला असे मत प्रेक्षकांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले. नाटकाचे दिग्दर्शन अशोक अडावदकर यांनी उत्कृष्ट रित्या केले होते.

Pimpri : आंद्रा धरणातील पाणी कमी झाल्याने चिखली परिसरात पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ

या नाटकात ज्योती कानेटकर ( प्रियंवदा) , सुभाष भंडारे (बाजीराव), अनुराधा पेंडुरकर (बब्बर), चंद्रशेखर जोशी ( बच्चू) , सुनिता येन्नूवार ( सुशील) सतीश सगदेव ( निळूभाऊ) , आणि अशोक अडावदकर ( प्रा. बल्लाळ) या भूमिका  उत्तम रीतीने सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. सर्व कलाकारांचा सत्कार माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह  देऊन करण्यात आला.

तसेच शोभा भंडारे यांचा सत्कार त्यांच्या विशेष योगदानासाठी शाल व श्रीफळ देऊन शैलजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या नाटकासाठी डॉ.ज्योती इंगोले, नाट्य समिती प्रमुख, ज्येष्ठ नागरिक संघ प्राधिकरण यांचे सहकार्य लाभले. पन्नास वर्षांपूर्वी ज्यांनी ह्या नाटकात भूमिका केल्या होत्या अशा.

3 कलाकारांचा यथोचित गौरव करण्यात आला.त्यामुळे पुर्नप्रत्ययाचा आनंद त्यांना मिळाला. आणि या नाटकाचे गारुड , इतक्या कालावधीनंतर सुध्दा रसिकांवर आहे हेच सिद्ध झाले. शिवाय, रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे, संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते, रसिकांनी, नेमक्या ठिकाणी उस्फूर्त दाद देऊन, कलाकारांना प्रोत्साहन ( Nigdi ) दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.