Pimpri : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर ( Pimpri ) स्टडीजच्या वतीने भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिके विजेते चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्तरावर विज्ञान 2024 अंतर्गत पोस्टर बनविणे, वादविवाद, मॉडेल मेकींग, रांगोळी (गुगल ते गुरुकुल) खाद्यपदार्थ, स्टार्टअप (नवीन कल्पना) प्रकल्प सादरीकरण, नशामुक्त अभियान, पर्यावरण जागरुकता, (ई-कचरा संकलन) या  स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धांचे आजोयन कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यात 619 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवित उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत युवा वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे, त्यासंदर्भात व्यसनाचे दुष्परिणाम, चांद्रयान मोहीम, पाण्याचा उपव्यय टाळा, पाणी वाचवा आदी सामाजिक( Pimpri ) व पर्यावरण विषयाला अनुसरून विविध प्रकारच्या प्रकल्पाचे सादरीकरण स्पर्धकांनी केले.

विज्ञान 2024 स्पर्धाचे सकाळच्या सत्रात उद्घाटन प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरात झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दुपारच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.रविंद्र जायभाये, प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्य डॉ.क्षितिजा गांधी, समन्वयक डॉ.जयश्री मुळे यांच्या हस्ते 42 विजेते स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रके बहाल करण्यात आली.

Chinchwad : एमडी प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर अपहरण व खंडणी प्रकरणातील दोन शिपाई शासकीय सेवेतून बडतर्फ

पारितोषिक वितरण समारंभात डॉ. रविंद्र जायभाये म्हणाले की, विज्ञान 2024 च्या स्पर्धेला पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. प्रतिभा महाविद्यालयाने राष्ट्रीय विज्ञान दिनांचे औचित्य साधून महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमधील सुप्त  कलागुणांना वाव देत त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्याचा प्रयत्न करून त्यांना व्यासपीठ निर्माण केले. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी प्रश्नांकडे एकांकी न पाहता विज्ञान जिज्ञासेतून परिश्रम, निरीक्षण करून नाविण्याची कास अंगिकार भविष्यात अभ्यासपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करून नवीन तंत्रज्ञान निर्मीतीचा ध्यास अंगिकारावा.

समारंभाच्या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी तर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. जयश्री मुळे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांच्या यादीचे वाचन डॉ. श्रृती गणपुले व प्रा. हेमलता चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोहित आकोलकर यांनी तर, आभार उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध विभागातील डॉ. रुपा शहा, डॉ. अनामिका घोष, डॉ. जयश्री ननावरे, प्रा. सुवर्णा गोगटे, प्रा. दिपाली महाजन, प्रा. हनुमंत कोळी समवेत प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विशेष परीश्रम ( Pimpri ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.