Pune : लग्नकार्यातील शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून तुंबळ हाणामारी; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-लग्नकार्य झाल्यानंतर शिल्लक राहिलेले गुलाब जामुन ( Pune ) घरी घेऊन जाण्यावरून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेवाळेवाडी ही घटना घडली. नातेवाईक आणि केटरर्स चालक यांच्यात हाणामारी झाली. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शेवाळेवाडी येथील राजीव मंगल कार्यालयात रविवारी लोखंडे आणि कांबळे परिवाराचा विवाह सोहळा होता. संजय लोखंडे यांनी हे मंगल कार्यालय बुक केलं होतं. तर जेवणाची व्यवस्था पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापक असलेल्या गुप्ता यांच्याकडे होती.

 

Pimpri : बीआरटी मार्गावर दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

दरम्यान लग्न कार्य पार पडल्यानंतर सर्व पाहुण्यांचे भोजन झाले. बहुतांश वराडी आपापल्या घरी निघूनही गेले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वर पक्षाकडील एक व्यक्ती किचनमध्ये गेली आणि त्याने शिल्लक जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. यावर केटरर्स चालकाने कुठलाही आक्षेप न घेता राहिलेले जेवण डब्यामध्ये भरण्यास सुरुवात केली. दरम्यान वर पक्षाकडील एक व्यक्ती त्या ठिकाणी असणारी गुलाबजामून डब्यात भरू लागला. त्यावेळी गुप्ता यांनी हे गुलाब जामुन उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केले आहेत तुमचे नाहीत ते घेऊ नका असे सांगितले.
याचा राग आल्याने तीन जणांनी गुप्ता यांना हाताने मारहाण केली. तर एकाने लोखंडी झारा गुप्ता यांच्या डोक्यात मारला. दरम्यान या सर्व गोंधळानंतर गुप्ता यांचे ओळखीचे त्या ठिकाणी आल्यानंतर आरोपी पळून गेले. या संपूर्ण प्रकारानंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Pune ) करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.