Pimpri : बीआरटी मार्गावर दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बीआरटी मार्गातून भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात असताना (Pimpri) कठड्याला दुचाकी धडकून अपघात झाला. त्यात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 25) पिंपळे निलख बीआरटी मार्गावर घडली.

 

रवींद्र सुकदेव ठाकरे (वय 32, रा. रावेत) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र ठाकरे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/जेजी 9914) सांगवी फाटा येथून जात होते. बीआरटी रोडने जात असताना पिंपळे निलख येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे दुचाकीची रस्त्याच्या कठड्याला धडक बसली. त्यात ठाकरे गंभीर जखमी झाले. त्यातच (Pimpri) त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.