Pune : पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या दिवशी गुणवत्तेचे अनोखे प्रदर्शन

एमपीसी न्यूज : पुण्यात सुरू असलेल्या एसएफए चॅम्पियनशीप्सच्या (Pune)  दुसऱ्या आवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरण अनुभवण्यास मिळाले. श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि गंगा लिजंड्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर फुटबॉल फीवर पाहायला मिळाला. या ठिकाण अंडर- 14, अंडर- 16 आणि अंडर- 18 चे सामने पाहायला मिळाले. सुवर्णपदकासाठी तीव्र स्पर्धा करत सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. 750 तरुण फुटबॉलर्सनी आपली सर्वोत्तम कामगिरी करत अक्षरशः प्रत्येक किकमध्ये निश्चय आणि कौशल्याचे प्रदर्शन केले.

एसएफए चॅम्पियनशीप्समध्ये लॉयला हायस्कूल, पाषाण पुणेच्या अयुष चव्हाणसारख्या कुशल खेळाडूंचे तिरंदाजीमधील कौशल्य पाहायला मिळाले. 13 वर्षांच्या अयुषने राष्ट्रीय आणि जिल्हा पातळीवर भाग घेतला असून आतापर्यंत 15 पदके मिळवली आहेत.

त्याशिवाय शरण्या सोनावणेनं अंडर- 14 धनुर्विद्या (रिकर्व्ह) विभागात दुसरे स्थान मिळवले. शरण्याचेचे एसजीएफआयमधील स्थान दहावे असून अंडर- 14 सीबीएसईमध्ये पाचवा क्रमांक आहे. आशिया वर्ल्ड बुक रेकॉर्ड्समध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे. शरण्या सोनावणे म्हणाली, ‘मी रोज दोन तास खेळते.

तिरंदाजीत ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवण्याचे आणि आशियाई खेळांत सहभागी होण्याचे माझे ध्येय आहे. माझे प्रशिक्षक अभिजित दळवे आणि चोई मिसुन माझे आदर्श आहेत.’

फुटबॉल मैदानावर चाहत्यांचा जोश सुरू असतानाच विमान नगर स्केटिंग रिंगवर कौशल्याचे अनोखे प्रदर्शन पाहायला मिळाले. सहभागी झालेल्या एकूण 740 खेळाडूंमध्ये अंडर-5 ते अंडर- 17 गटातील मुले सहभागी झाली होती, तर अंडर-7 ते अंडर- 14 गटातील मुलींनी रोमहर्षक प्रदर्शन केले.

उत्साहाने भारलेल्या वातावरणात सियाच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सियाचे वडील संग्राम चौघुले म्हणाले, ‘तीन वेळा विश्वविजेते या नात्याने आपले शरीर तंदुरूस्त ठेवले, तर मनही सुदृढ राहाते यावर माझा ठाम विश्वास आहे. (Pune) विशेषतः कोविडच्या काळात निरोगी राहाणं जास्त महत्त्वाचं असल्याचं परत एकदा सिद्ध झालं. पहिल्यांदाच आमची पाल्य एसएफए चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होत आहे.

एसएफए लहान वयापासून खेळाचे संस्कार रूजवण्यासाठी आणि पूर्ण देशाला सुदृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे हे कौतुकास्पद आहे फिट इंडिया सदस्य या नात्याने आम्ही क्रीडा मंत्र्यांच्या सहकार्याने फिटनेसची शाळेपासून सुरुवात करत भारताला निरोगी बनण्याची चळवळ चालू केली आहे.’ संग्राम चौघुले यांन 2012 मध्ये 85 किलो विभागात मि. युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे.

Pune : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कलाकारांच्या नावांची घोषणा

त्यांनी सहा वेळा मि. इंडियाचा किताब जिंकला असून ते पाच वेळा मि. महाराष्ट्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तिरंदाजी स्पर्धा रंगली होती. अंडर- 10, अंडर-14 आणि अंडर- 17 विभागातील एकूण 150 खेळाडू सहभागी झाले होते व त्यात मुले तसेच मुलींचा समावेश होता. उपांत्य फेरीत लढत करत त्यांनी रिकर्व्ह विभागात अचूक वेध घेतला.

तिसऱ्या दिवशी बॅडमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, कराटे, थ्रोबॉल आणि टेनिस या खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. प्रत्येक खेळाचे वेगळे वैशिष्ट्य असून त्यांचा जोश अनुभवण्यासाठी, तरुण खेळाडूंची असामान्य गुणवत्ता अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल आमच्या www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रियल टाइम अपडेट्स, हायलाइट्स आणि एक्सक्लुसिव्ह बिहाइंड द सीन्स क्षणांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आमची सोशल मीडिया चॅनेल्स फॉलो करा.

एसएफए चॅम्पियनशीप देशातील तरुण खेळाडूंमध्ये खेळाची आवड तयार करण्यासाठी बांधील असून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन उद्याचे कुशल खेळाडू घडवण्याचे ध्येय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.