Pune : अभिनेता आर माधवन यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – अभिनेता आर माधवन यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड ( Pune) करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आर माधवन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अलीकडेच आर माधवन च्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Pimpri : पहाटेपासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाचे जोरदार कमबॅक, चिंचवडेनगर येथे घरात शिरले पावसाचे पाणी

याविषयी शुभेच्छा देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की तुमचा अफाट अनुभव आणि भक्कम नीतिमत्ता या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला उच्च पातळीवर नेईल. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.’

आर. माधवन हा हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आत्तापर्यंत विविध हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच कन्नड सिनेमातही त्याने काम केलं आहे. 1997 मध्ये आलेल्या इन्फर्नो या इंग्रजी सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. हिंदी, तमिळ या सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करुन माधवनने त्याचा असा खास चाहता वर्ग तयार केला आणि तो टिकवलाही. राजू हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मध्येही तो झळकला होता. तर ‘रहना है तेरे दिल मे’ सिनेमातला त्याचा रोल प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.