Pimpri : पहाटेपासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाचे जोरदार कमबॅक, आठवाजेपर्यंत 81 मीमि पावसाची नोंद

एमपीसी न्यूज – काही दिवसाची उसंत घेतल्यानंतर ( Pimpri ) पावसाने आज (शनिवारी) पहाटेपासून पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. सकाळपासून शहरातील सर्वच भागात पावसाने रिपरीप सुरु केली आहे. आठवाजेपर्यंत 81 मीमि पावसाची नोंद झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंचवडेनगर येथील श्रीराम कॉलनी परीसरात घरात पाणी घुसल्याचेही पहायला मिळाले.

Jalna Maratha Andolan : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले; दगडफेकीसह पेटवली वाहने

हवामान व वादळांचे अभ्यासक विनीत कुमार यांनी केलेल्या ट्वीटनुसार चिंचवड परिसरात पावसाची नोंद झाली आहे. तर पाषाण येथे 13.5 मीमि,बिबेवाडी 36 मिमी तर शिवाजीनगर येथे 17.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी पाणे आठ वाजे पर्यंत 81 मीमि

Talegaon Dabhade : चित्रपट या माध्यमाकडे फक्त करमणूक म्हणून न पाहता एक कला म्हणून अभ्यास करणे गरजेचे आहे- डॉ.अनंत परांजपे

अवघ्या तीन तासात झालेल्या पावसामुळे प्राधिकरण परिसरातील चिंचवडेनगर येथील श्रीराम कॉलनीत पावसाचे पाणी घरात घुसल्याची वर्दी निगडी प्राधिकरण अग्निशमन दलाला आली होती. मात्र हे पाणी हळूहळू ओसरले.

पहाटे सुरु झालेला पावसाचा जोर सकाळी आठ पासून उतरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दाटलेल्या ढगांमुळे अद्यापही काही भागात सुर्यदर्शन झालेले नाही. मागील दोन दिवसाच्या उकाड्याची जागा आता गारवा व पावसाने ( Pimpri ) घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.