Jalna Maratha Andolan : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले; दगडफेकीसह पेटवली वाहने

एमपीसी न्यूज – जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी (Jalna Maratha Andolan) गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते. मात्र आंदोलनकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन चिघळले आहे. आंदोलकांनी 4 बसेस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमके कसे घडले हे प्रकरण ते पाहूया…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.

आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी पोलिस आणि आंदोलकांमध्ये दोन वेळा चर्चा (Jalna Maratha Andolan)झाली. पण त्यातून काही साध्य झालं नाही. पावणे सहाच्या सुमारास  पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी आला. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाला. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला.

Alandi : बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आळंदीमध्ये पावसाची जोरदार हजेरी

प्रकरण चिघळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी दोनदा हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले.

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलकांकडून धुळे- सोलापूर महामार्गावर जाळपोळ करण्यात आली. मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यांना अज्ञान स्थळी नेण्यात आलं आहे.

हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात (Jalna Maratha Andolan) येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.