Alandi : बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आळंदीमध्ये पावसाची जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज – पावसाच्या बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर (Alandi) आळंदी मध्ये आज दि.2 रोजी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मरकळ रस्ता,वडगाव रस्ता,नगरपालिका चौक रस्ता ,चाकण रस्ता इ.ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहताना दिसत होते.

Today’s Horoscope 02 Sepetember 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आळंदी ग्रामीण परिसरातील शेतातील सोयाबीन फुलवऱ्यावर आले होते. बरेच दिवस पाऊस नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतातील पिकांवर  होऊ लागला होता. पाऊस नसल्याने शेतातील हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु आजच्या या पावसाने येथील बळीराजाला थोडा का होईना दिलासा मिळाला (Alandi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.