Today’s Horoscope 02 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – : आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

02.09.2023.

 शुभाशुभ विचार- 10 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ* – सकाळी 9.00 ते 10.30

दिशा शूल -पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा 12.31 पर्यंत नंतर रेवती.

 चंद्र राशी – मीन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

आजचा दिवस खर्चाचा आहे. बचतीचा विचारच सोडून द्या. घरात थोरामोठ्यांशी काही वैचारिक मतभेद संभवतात. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. वादविवाद मात्र टाळा.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुम्ही जे जे चिंताल ते ते होईल कदाचित तुमच्या पात्रतेपेक्षा जास्तच काहीतरी पदरात पडेल. आज फक्त शुभ बोला आणि शुभ चिंता.

मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. कदाचित तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पतकरावी लागेल.

कर्क (शुभ रंग- निळा.)

आज तुमच्या अथक परिश्रमांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. तुम्हाला सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादी धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

सिंह (शुभ रंग- राखाडी )

आज कोणतीही धाडसाची कामे करू नका स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या ( शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्याकडून होईल.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की मिळेल. काही येणी असतील तर अनपेक्षित रित्या वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. गूढशास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येऊ शकते.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्याही अभ्यासात डोकवावेच लागणार आहे.

मकर ( शुभ रंग- पांढरा )

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चाल ढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा ठेवू नये.

कुंभ (शुभ रंग – निळा)

खिशात आज पैसा खेळता असल्याने तुम्ही आनंदी उत्साही असाल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा. गृहिणींना काही प्रिय पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

मीन -(शुभ रंग – मीन )

आज स्वतःचेच खरे करण्याचा अट्टाहास करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी असू द्या. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. गोडबोल्या मंडळींपासून मात्र आज सावध रहा.

 जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व श्रीवास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.