Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे, अनंत चतुर्दशीला वरुण राजा लावणार हजेरी

एमपीसी न्यूज – पुणे वेधशाळेने अनंत चतुर्धशी निमीत्त पावसाचे (Maharashtra)विशेष माहितीपत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये गणेश भक्तांना पुढील दोन दिवसात उकाडा व पाऊस या दोन्हींचा सामना करावा लागणार आहे. विदर्भाचा काही भाग वगळता राज्यात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे व आसपासच्या परिसरात विसर्जनाच्या दिवशी ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर तापमान हे 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असल्याने काहीसा उकाडा ही जाणवणार आहे.
Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा जीत थोरात बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा
पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात हलक्या तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकण पर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर ढगाची दाटी झालेली आहे.
घाट परिसरात सतर्कतेचा इशारा
या कालावधीत माळशेज घाट आणि खंडाळा घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला ही देण्यात आला आहे. सतर्कच्या माहितीनुसार, पुणे (दौंड, शिरूर, हवेली, जुन्नर, मावळ, पुणे शहर, पिंपरी चिंचवड), दरम्यान, मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती तयार होऊ शकते. त्याचबरोबर माळशेजघाट, खंडाळाघाट येथून प्रवास करताना नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण मुसळधार पावसामुळं डोंगरावरून दगड, माती घसरून येण्याची, झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवारी संध्याकाळी पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार (Maharashtra) पाऊस झाला.
गेल्या 24 तासांत पुण्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे