Talegaon Dabhade : फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मासिस्टचा सत्कार 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर (Talegaon Dabhade) संस्था संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयात फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तळेगाव दाभाडे आणि परिसरातील सर्व फार्मासिस्टचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सदस्य नितीन देव उपस्थित होते यावेळी  संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर,पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व इ सी मेंबर सुरेश बाफना,तालुका कार्याध्यक्ष नेमिचंद गुंदेशा,तळेगाव शहर अध्यक्ष प्रमोद दाभाडे डाॅ संजय आरोटे, प्रा जी एस शिंदे, प्रा.गणेश म्हस्के व्यासपिठावर उपस्थित होते

फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने स्लेफी विथ फार्मासिस्ट,रांगोळी (Talegaon Dabhade) स्पर्धा, २ डी चार्ट स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा अंगदान हेच श्रेष्ठदान या तत्वावर आधारित होत्या.अंतिम वर्ष बी.फार्मसीची विद्यार्थिनी रचना लोखंडे आणि पल्लव खोलम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे, अनंत चतुर्दशीला वरुण राजा लावणार हजेरी

कार्यक्रमात बोलताना विश्वस्त निरुपा कानिटकर, प्राचार्य डॉ. संजय आरोटे आणि प्रा.गणेश म्हस्के यांनी फार्मासिस्टचे समाजाप्रती असणारे योगदान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन देव, सुरेश बाफना यांनी देखील फार्मासिस्टचे मनोबल वाढविले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तळेगाव आणि परिसरात अनेक वर्ष सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या फार्मसिस्ट यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्रक देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात फार्मासिस्ट सुनील जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा पूजा कुंभार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाची सांगता करताना डॉ. मयुरी गुरव यांनी सर्व फार्मासिस्ट बंधू आणि भगिनींचे तसेच सर्व आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, संस्थेच्या विश्वस्त व उद्योजिका निरुपा कानिटकर यांनी शुभेच्छा (Talegaon Dabhade) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.