Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा जीत थोरात बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा

एमपीसी न्यूज – एम्प्राॅस स्कूलमध्ये (Talegaon Dabhade) आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता नववीतील जीत थोरात याने बुद्धिबळ स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले.

Vadgaon : प्रादेशिक पाणी योजनांच्या कामांना गती द्या – आमदार सुनिल शेळके यांचे आदेश

शनिवारी (दि. 23) या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण 35 शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पहिल्या 10 विजेत्यांची निवड करण्यात आली. पहिल्या तीन विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली. 7 विध्यार्थ्यांना मेडल देण्यात आले.

यावेळी शाळेच्या शिक्षिका शितल आयनापर्थी उपस्थित होत्या. संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे,खजिनदार गौरी काकडे,शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व शाळेच्या सर्व शिक्षकांनी जीत थोरात यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा (Talegaon Dabhade) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.