Pune : अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन

एमपीसी न्यूज : प्रख्यात अभिनेत्री आणि नाट्य कलाकार उत्तरा बावकर यांचे (Pune) दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. गेल्या एक वर्षापासून आजारी असलेल्या बावकर यांनी वयाच्या 79 व्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.

बावकर यांनी ‘मुख्यमंत्री’मध्ये (Pune) पद्मावती, ‘मेना गुर्जरी’मध्ये मेना, शेक्सपियरच्या ‘ऑथेलो’मध्ये डेस्डेमोना आणि नाटककार गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’ नाटकात आईची भूमिका केली होती. गोविंद निहलानी यांच्या ‘तमस’ या चित्रपटातील भूमिकेनंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आली.

Pune News : डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराने प्रमोद महाराज जगताप आणि रघुवीर खेडकर यांचा सन्मान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.