Pune : इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज -इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून पडून एका वृध्द महिलेचा जागीच (Pune)  मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना शनिवार पेठ परिसरात आज (शुक्रवार दि. 14)  सकाळच्या सुमारास घडली.

विजया दुदाठे (वय 76) असे मृत्युमुखी पडलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

India : भारताची वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड

विजया दुदाठे या शनिवार पेठेतील एका इमारतीत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होत्या. काही महिन्यांपासून त्यांना सातत्याने चक्कर येत होती.

याशिवाय विजया आजारी सुद्धा होत्या.दरम्यान, आज सकाळी नेहमीप्रमाणे विजया इमारतीवर सहाव्या मजल्यावर असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेल्या.

खाली उतरत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या थेट खाली कोसळल्या.

या घटनेत विजया यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Pune)झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.