Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 30 ऑगस्ट अंतिम तारीख

एमपीसी न्यूज – नियमीतपणे अभ्यास करता न येणाऱ्या वंचित, नोकरदार किंवा महिलावर्गांना (Pune) शिक्षणाची संधी उपलब्ध करणाऱ्या मुक्त व दूरस्थ अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जुलै-ऑगस्ट सत्राच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू केले आहे.

Akurdi : विवेकानंदांच्या विचारातून युवाशक्तीचा विकास शक्य – डॉ अभय जेरे 

ऑनलाइन अर्जाची छापील प्रत अभ्यास केंद्रात कागदपत्रांसहित जमा करण्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबरची देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वतीने कला आणि वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम घेण्यात येतात.

दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या http://unipune.ac.in/SOL/ या संकेतस्थळाला भेट (Pune) द्यावी.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.