Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून बळीराजा मुदत कर्ज योजना सुरू – डॉ. दिगंबर दुर्गाडे

एमपीसी न्यूज – शेतीच्या खर्चासाठी बळीराजा (Pune) मुदत कर्ज योजना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जनावरांच्या देखभालीचा खर्च, औषधोउपचार, घराची दुरुस्ती, यात्रा, विवाह, शेतकऱ्यांच्या आकस्मिक गरजांचा समावेश असेल. त्याचबरोबरच केंद्र व राज्य सरकारांकडून अनुदान व सवलत योजनांसाठी बँकेमार्फत कर्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बॅकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहाय्यक सरव्यवस्थापक समीर राजपूत, उपसरव्यवस्थापक संजय वाबळे, सुधीर पाटोळे उपस्थित होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नोव्हेबर 2023 अखेरची आर्थिक स्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. (Pune) बळीराजा मुदत कर्ज योजनेअंतर्गत बँकेच्या शेतीकर्ज विभागामार्फत विविध कार्यकारी संस्थांना थेट कर्जदार सभासदांना प्रति एकरी कमीत कमी एक लाख ५० हजार रुपये ते कमाल सात लाख रुपये कर्ज दिले जाईल.

Pune : विकासासाठी सत्तेत गेलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘हाती अर्थखाते’ असूनही ‘पुणे मेट्रो’कडे दुर्लक्ष; काँग्रेसचा संतप्त सवाल

ही यंदा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेसाठी साडेदहा टक्के व्याजदर आणि परतफेडीची मुदत सात वर्षे आहे. त्याबरोबरच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायभूत सुविधा निधी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकाम महामंडळ या योजनांसाठी पीडीसीसीमार्फत कर्ज पुरवठा केला जाणार आहे, असेही डॉ. दुर्गाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.