Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत जुंपण्याची चिन्ह

एमपीसी न्यूज – यापुढील काळात पुण्याचा खासदार (Pune) हा शिवसेनेचाच असेल, असे ठणकावून सांगणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत चांगलीच जुंपण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढविणार असल्याचे संजय राऊत यांनी निक्षून सांगितले. त्यावर काँग्रेसने अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही. महाविकास आघाडीत 1 – 1 जागेला महत्व देण्यात येत आहे. पुणे हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तो सहकारी पक्षाला देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी घेतली आहे.

Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून बळीराजा मुदत कर्ज योजना सुरू – डॉ. दिगंबर दुर्गाडे

तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने पुणे लोकसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला (Pune) आहे. काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेतर्फे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे. भाजपतर्फे माजी माहापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.