Pune : कोथरूड परिसरात शरद पवारांच्या समर्थनात झळकले बॅनर्स

एमपीसी न्यूज –  काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित ( Pune) पवारांचा आहे असा निर्णय दिला. तसेच घड्याळ हे चिन्हही अजित पवारांनाच दिलं आहे. या निर्णयाला  शरद पवार गटाकडून  चांगलाच विरोध दर्शविण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक कोथरूड (शरद पवार गट ) अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड परिसरात शरद पवारांच्या समर्थनात ठीक ठिकाणी बॅनर्स लावले आहेत .

यावेळी बोलताना गिरीश गुरनानी म्हणाले, आमच्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब  आहेत.

Pune : पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खून

गुरनानी यांनी उभारलेल्या  बॅनर्समध्ये म्हटले आहे की,  ‘ फिर हेरा फेरी’ , ‘हुकूमशाही पद्धतीने पक्ष आणि चिन्ह मिळवाल….पण लोकांच्या मनात घर कसे कराल..जोर जबरदस्तीने अन्याय करू शकता, लोकांचे प्रेम मिळू शकत नाही.” उठ मित्रा जागा हो,या अन्यायाच्या विरोधातल्या लढाईचा धागा हो.’ ‘ एक सूर्य,एक चंद्र आणि एकच शरदचंद्र ..’

या वेळी अमोल गायकवाड, सचिन यादव, यनपुरे सर, तेजस बनकर ,आयुष बोडके उपस्थित ( Pune)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.