Pune Cirme News : व्याजासह मुद्दल देऊनही ठार मारण्याची धमकी; कोथरूडमधील गुंड नाना कुदळेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्या व्याज (Pune Cirme News ) आणि मुद्दल देऊनही आणखी पैशाची मागणी करत एका व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या कोथरूड मधील गुंड नाना कुदळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुप्पट रक्कम देऊनही होस्टेलच्या 3 रुमचा ताबा व 2 लाख रुपये न दिल्यास त्याने एका व्यक्तीला ठार मारण्याची धमकी दिली होती.

नाना बाळु कुदळे (वय 40, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) आणि मंगेश ऊर्फ गणेश भगवान दिघे (वय 31, रा. राजीव गांधी पार्क, कोथरुड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत. एका 32 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. नाना कुदळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Pune News :भारतीय विद्या भवनमध्ये सावरकरांच्या काव्यावर कार्यक्रम

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूडमधील एकाने आर्थिक अडचण असल्यामुळे गणेश दिघे यांच्या मध्यस्थीने नाना कुदळे यांच्याकडून सात लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याजदराने घेतले होते. याच्या मोबदल्यात त्याने व्याज आणि मुद्दल असे मिळून 13 लाख 81 हजार रुपये परत केले. मात्र तरीही नाना कुदळे यांनी आणखी पैशाची मागणी करत फिर्यादी तरुणाला ठार मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपी नाना कुदळे हा फिर्यादीच्या होस्टेलवर आला. त्याने तेथील सीसीटीव्हीची तोडफोड करत 3 रुमचा ताबा देण्याची व आणखी 2 लाख रुपये देण्याची मागणी केली; ते न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे (Pune Cirme News ) फियार्दी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.