Crime News : पिंपरी चिंचवड येथून 34 हजाराचा हुक्का व सिगारेट जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या सांगवी व हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी 34 हजार रुपये किमतीचा हुक्का, सिगारेट व गुटखा जप्त (Crime News) केला आहे. ही कारवाई आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने शनिवारी ( दि.23) केली आहे.

 

 

यामध्ये संगवीतील विशालनगरमध्ये असणाऱ्या माऊली पानशॉपवर छाप टाकत समाधान शामराव जाधव ( वय 32 रा. पिंपळे निळख) याला अटक केली असून त्याचा साथीदार नामदेव सर्जेराव शिरोळे ( रा. कोथरूड) हा फरार झाला आहे. या वेळी पोलिसांनी 13 हजार 352 रुपयांचा सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त (Crime News) केला आहे. तर हिंजवडी येथील विनोद व अमित या पान स्टॉलवर कारवाई करत पोलिसांनी श्रीराम कचरू शेळके (वय 26 रा. हिंजवडी), आशिष तुकाराम हेंडगे (वय 24 रा. वाकड)
इर्शाद मोहीन शेख (वय 28 रा. वाकड) यांना अटक केले असून या आरोपींना माल पुरवणारे श्रीनिवास पाटील उर्फ प्रदिप राजपूत व शाम (पूर्ण नाव माहिती नाही) रा. तळेगाव हे अद्याप ताब्यात नाहीत.

 

 

या आरोपींकडून पोलिसांनी 17 हजार 609 रुपयांचा हुक्का तर 3 हजार 419 रुपयांची सिगारेट जप्त केली आहे. यावेळी पोलिसांनी 34 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही छाप्यातील आरोपींवर (Crime News) पोसत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंजवडी व सांगवी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.