Indapur News : इंदापूर तालुक्यातील शेतात कोसळले विमान

एमपीसी न्यूज – इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे.

 

बारामतीतील कार्व्हर एव्हीएशनमार्फत प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमान खाली कोसळले. हे विमान इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त केला आहे. हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.