Pune crime News : हडपसर परिसरातील घरफोडीच्या दीड लाखांचा ऐवज लंपास, ज्वेलर्स दुकानही फोडले

एमपीसी न्यूज – हडपसर येथील ज्वेलर्स दुकानाचे शटर उचटकटून चोरट्यांनी 50 हजारांचे दागिने चोरुन नेले आहेत तर, शेवाळवाडीत एक फ्लॅट फोडून 1 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.‌

ज्वेलर्स दुकानातील चोरीच्या प्रकरणी सवाईसिंग राठोड (वय 27, रा. भेकराईनगर ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाईसिंग यांचे महादेव ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 18 ते 19 ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी 50 हजारांचे दागिने चोरुन नेले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

तसेच शेवाळेवाडी भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून कपाटातील 15 हजारांच्या रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 65 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी आकाश कोलते (वय 22, रा. शेवाळेवाडी ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.