Express Way crime News : टेम्पोच्या धडकेत पन्नास फूट फरफटत गेलेल्या क्लीनरचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रकच्या टायरमधून आवाज येत असल्याने टायर चेक करण्यासाठी खाली उतरलेल्या क्लीनरला एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये क्लीनर 50 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 20) पहाटे चार वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Express Way) सोमाटणे गावाच्या हद्दीत घडली.

मधुगोडा परशुराम भोसले असे मृत्यू झालेल्या क्लीनरचे नाव आहे. याबाबत बाळकृष्ण शुबराव चव्हाण (वय 25, रा. कोणतेव बोबलाद, ता. जत, जि. सांगली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो (एम एच 47 / वाय 0230) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळकृष्ण आणि त्याचा क्लिनर हे दोघे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून ट्रक (के ए 23 / बी 2769) घेऊन जात होते. सोमाटणे गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रकमधून आवाज येऊ लागला.

त्यामुळे बाळकृष्ण यांनी ट्रक बाजूला घेऊन थांबवला. आवाज कशाचा येत आहे, हे चेक करण्यासाठी क्लीनर भोसले खाली उतरला. ट्रकचे टायर चेक करत असताना अचानक भरधाव वेगात मागील बाजूने एक टेम्पो आला. त्याने जोरात क्लीनरला धडक दिली.

या धडकेत क्लीनर सुमारे 50 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी टेम्पो चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.