Talegaon : गोमांस वाहतूक प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज बेकायदेशीरपणे गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात (Talegaon)आली. ही कारवाई शनिवारी (दि. 13) सायंकाळी स्टेशन चौक तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.
मोहीद रियाजत खान (वय 41, रा. मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खान याने त्याच्या (Talegaon)ताब्यातील वाहनातून (एमएच 04/एलईडी 5214) बेकायदेशीरपणे गोमांस वाहतूक केले. याबाबत शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलिसांनी स्टेशन चौकात कारवाई करत टेम्पो पकडला.
त्यातून पोलिसांनी एक लाख 60 हजार रुपये किमतीचे 800 किलो गोमांस आणि चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करत आरोपीस अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.