एमपीसी न्यूज – तीन ट्रक चालकांनी मिळून त्यांच्या ताब्यात (Chakan)दिलेल्या 31 टन 640 किलो भंगार मालाचा अपहार केला. ही घटना आठ ते 12 जानेवारी या कालावधीत नाणेकरवाडी येथील मधुबन ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.
गौरव पारसमल गादिया (वय 41, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी (Chakan)चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील सांगळे, राहुल निकम, सागर रावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या कंपनीतील भंगार साहित्य दोन ट्रक मध्ये भरून आरोपींच्या ताब्यात दिले. हे साहित्य कोल्हापूर येथे पोहोचविण्यास सांगण्यात आले होते. मात्र ट्रक चालक आरोपींनी ते साहित्य कोल्हापूर येथे न पोहोचवता दोन ट्रक मधील 15 लाख चार हजार 608 रुपये किमतीच्या 31 टन 640 किलो भंगार साहित्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.