Pimpri : वास्तु रचनाकारांनी भविष्यातील बदलांसाठी सज्ज व्हावे – डॉ. अनिल कश्यप

एमपीसी न्यूज  – नव नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक क्षेत्रात (Pimpri)आमूलाग्र बदल होत आहेत. यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आगामी काळात वास्तू रचना शास्त्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
विद्यार्थ्यांनी भविष्यातील या बदलांसाठी सज्ज होवून हे तंत्रज्ञान आत्मसात (Pimpri)करावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज विकासासाठी करावा, असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च (निकमार) विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये माजी विद्यार्थ्यांचा गौरव आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पूनम कश्यप, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक वर्ष 2016, 17, 18, 19 मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वास्तु विशारद महेश नामपूरकर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रेरणा फिरता करंडक’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आर्किटेक तेजस गव्हाणे, निशिद उंद्रे, अंकिता बारणे, ओमकार चोरमले या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. महेंद्र सोनवणे, सूत्रसंचालन डॉ निलिमा भिडे यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.