Talegaon : मुलाच्या लग्न सोहळ्यातून वरमाईचे पावणे पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – स्वतःच्या च मुलाच्या लग्न सोहळ्यातून (Talegaon) तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना सामोटणे येथील एमरॉल्ड हॉटेल येथे 20 जानेवारी रोजी घडली.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26) महिलेने फिर्याद दिली आहे. यावरून अनोळखी महिले विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Alandi : एमपीसी न्यूजच्या बातमीची दखल; आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचे 20 जानेवारी रोजी इमरॉल्ड हॉटेल येथे लग्न होते. यावेळी फिर्यादी यांच्याकडील पिशवीमध्ये पर्स होती जी चोरीला गेली. त्यामध्ये 4 लाख 83 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख (Talegaon) रक्कम, कागदतपत्रे, मोबाईल असा ऐवज चोरून नेला आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.