Alandi : एमपीसी न्यूजच्या बातमीची दखल; आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील सिद्धबेट बंधाऱ्या वरील आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती लागल्याचे दिसून येत होते. या गळती मुळे पाण्याचा अपव्यय होत होता. ही मुख्य जलवाहिनी असल्याने तिची गळती बंदी होणे आवश्यक होते. याबाबत एमपीसी न्यूजने या आधी वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेत या मुख्यवाहिनीचे काम करण्यात आले आहे.

Pimpri : उद्योगनगरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दिवसेंदिवस हळूहळू गळतीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाण्यामुळे लोखंडी पाइपलाइनच्या तेथील भागात गंज चढून गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. या मुख्य जलवाहिनीलाच पुढे मोठी गळती लागल्यास आळंदी शहरातील पाणीपुरवठा काही कालावधी करिता ठप्प होऊ शकतो. याबाबत एमपीसी न्यूज बातमी प्रसारीत केली होती. त्याची (Alandi) दखल आळंदी पालिका प्रशासन घेत तेथील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली आहे. याबाबत माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली. ही दुरुस्ती केल्याने पाण्याचा अपव्यय टळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.