Pune : राफेल प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

एमपीसी न्यूज- राफेल विमान खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘देश का चौकीदार चोर है’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

यावेळी रमेश बागवे म्हणाले की, राफेल खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. त्यानी जनतेचा विश्वासघात केला असून निवडणुकीमध्ये पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या मोदींचा हाच का पारदर्शक कारभार असा सवाल उपस्थित करीत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.