Hinjawadi : दगडाने ठेचून निर्घृणपणे एकाचा खून

एमपीसी न्यूज – एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे पुणे-मुंबई महामार्गावर आज (बुधवारी) सकाळी उघडकीस आली.

खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष आहे. अंगावर निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर बावधन येथे सर्व्हिस रस्त्यावर एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. खून झालेली व्यक्ती कामगार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.