Pune :पीएमपीएल बसच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – पीएमपीएल बसच्या जोरदार धडकेत दूचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (दि.25) साडेसात च्या दरम्यान  औंध रोड बाल कल्याण संस्थे समोरील पुणे विद्यापीठाकडे जाणा-या रोडवर घडली.
प्रवेश रामदास कसबे(वय 21, रा.औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे तर विशाल विजय सत्तावन(वय 19,रा. औरंगाबाद) असे त्याच्या जखमी मित्राचे नाव आहे. याप्रकरणी जय एकनाथ रोरे (वय 21, रा.वाळुज, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश आणि विशाल हे दोघे मित्र त्यांच्या दूचाकीवर  औंध रोड बाल कल्याण संस्थेसमोरील पुणे विद्यापीठाकडे जाणा-या रोडवरून काल रात्री जात होते. दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएल बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीररित्या जखमी होऊन प्रवेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचा मित्र विशाल हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
याप्रकरणी पीएमपीएलवरील अज्ञात बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:श्रुंगी पोलीस स्टेशन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.