Pune News : पीएमपीएलच्या ताफ्यात पुढील वर्षी “डबल डेकर बस” दाखल होणार

एमपीसी न्यूज : पुण्यात पुढील वर्षी पासून “डबल डेकर” बस धावण्याची शक्यता आहे. पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) च्या ताफ्यात (Pune News) पुढील वर्षी “डबल डेकर बस” दाखल होण्याची शक्यता आहे.पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दल माहिती दिली आहे. 

बकोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत.”

Pune News : काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल – शरद पवार

दरम्यान आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी-चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल.(Pune News) त्यानंतर याबद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, असे बकोरिया पुढे म्हणाले. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यात देखील “डबल डेकर बस धावताना दिसू शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.