Pimpri :राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी भोसरी विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब उर्फ बाबासाहेब काळुराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश यशवंतराव नागोसे यांनी दिले.

बाळासाहेब जाधव यांची भोसरी विधानसभा अध्यक्षपदावर निवड 25 डिसेंबर 2018 ते 25 डिसेंबर 2019 या एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर आणि भोसरी विधानसभेच्या प्रत्येक वॉर्डात पक्षाच्या शाखा स्थापन करायच्या आहेत. तसेच राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाची ध्येय धोरणे जनमानसात पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे पत्रात सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.