Pune : लोकसभेसाठी काँग्रेस – भाजपमध्ये उमेदवाराची चाचपणी

एमपीसी न्यूज – ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारांची (Pune) चाचपणी सुरू झाली आहे. उमेदवार मराठा द्यावा की ब्राह्मण, यावर बरीच खलबते सुरू आहेत. खासदार बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे. मागील 10 वर्षांपासून पुणे लोकसभेला भाजपचा झेंडा फडकवीत आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्याने पुणे लोकसभेलाही अनेकजण तयारीला लागले आहेत.

पुण्यातील काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांचा एक गट आहे. दुसरा गट हा प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे समर्थकांचा आहे. त्या दोन्ही गटांकडून इच्छुक उमेदवारांची नावे पुढे करण्यात येत असताना, आता माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हेदेखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे नाव चर्चेत आले आहे.

Talegaon Dabhade : महिलेची 14 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याला अटक

छाजेड हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. कलमाडी हे सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतर छाजेड हेदेखील गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त होते. त्यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून येऊ लागल्याने एक गट हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या एका गटाने थेट पक्षाच्या ‘हायकमांड’च्या एका महिला स्वीय सहायकाशी संपर्क वाढविला आहे. चर्चेत असलेल्या (Pune) महिला पीए यांच्या गेल्या काही दिवसांपासून पुणे भेटी वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनीही पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. तर, भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर आणि बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांची नावे चर्चेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.