Pune Crime News : शेजारी राहणार्‍या महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – शेजारी राहणारी महिला घरात एकटी (Pune Crime News ) असल्याचे पाहून तिच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साठे नगर परिसरात 8 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

PCMC : ‘आयुक्तसाहेब आता ‘ऑनफिल्ड’ उतरा, जनतेच्या समस्या जाणून घ्या’

प्रवीण लक्ष्मण जगधने (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 28 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे शेजारी शेजारी राहतात.

शनिवारी दुपारी फिर्यादी या घरात झोपल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांच्या घरात नकळत प्रवेश करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.   या संपूर्ण प्रकाराने फिर्यादी महिलेला जाग आली आणि तिने आरडा केल्यानंतर आरोपी पळून गेला.

यानंतर फिर्यादी महिलेने वानवडी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी (Pune Crime News ) गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.