Pune Crime News : अम्युनेशन फॅक्टरी परिसरातील चंदनाच्या 8 झाडाची चोरी

एमपीसी न्यूज – पुण्याच्या खडकी परिसरात असलेल्या अम्युनेशन फॅक्टरी परिसराच्या आवारात असलेली चंदनाची 8 झाडे अज्ञात चोरट्याने चोरून नेली. 19 ते 20 जूनच्या रात्री हा प्रकार घडला. केशव पतंगे (वय 59) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडकी परिसरात ही अम्युनेशन फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील मॅगझिन परिसरात चंदनाची आठ झाडे होती. 19 आणि 20 जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या फॅक्टरीच्या आवारात प्रवेश करून आठही चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा असलेले खोड चोरून नेले आहे.

खडकी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.