Talegaon Dabhade News: रोटरी क्लब ऑफ मावळच्या अध्यक्षपदी प्रशांत भागवत

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ मावळच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रशांत भागवत यांनी नुकतीच स्वीकारली. सचिवपदी दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर क्लबचे मावळते अध्यक्ष रवींद्र घारे, नामनिर्देशित प्रांतपाल अनिल परमार, प्रांतपाल विशेष प्रतिनिधी शेखर झीलपेलवार, डॉ शुभांगी कोठारी,पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले, मेघा भागवत, दीपक चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ. सुदाम खेडेकर यांना प्राईड ऑफ मावळ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. योगाचार्य प्रा. वसंतराव पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. निकिता घोटकुले आणि उद्योजक नितीन घोटकुले यांनी रोटरी क्लब ऑफ मावळच्या रुग्णालयासाठी एक एकर जमीन देण्याचे जाहीर केले. अनिल परमार यांनी रोटरी क्लब राबवित असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

डॉ. सुदाम खेडेकर यांनी कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.क्लबच्या माध्यमातून आरोग्य विषयक तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे प्रशांत भागवत यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

दरम्यान, आमदार सुनील शेळके, पंचायत समितीचे माजी विठ्ठलराव शिंदे, यांनी भेट देऊन नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पोटे, रेवप्पा शितोळे यांनी केले. दीपक चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.