Pune Crime News :अनैतिक संबंधावरून प्रेयसीच्या पतीला ठार मारण्याची धमकी; पुण्यातील PSI वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -अनैतिक संबंधावरून प्रेयसीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून (Pune Crime News) तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे पोलीस राहतील एका पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण नागेश जर्दे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड येथील एका सोसायटीत 19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.

Pune Cime News : पुण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

या प्रकरणी अधिक माहिती अशी की प्रवीण जर्डे सध्या शिवाजीनगर कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहेत. प्रवीण जरदे याचे कोथरूड परिसरातील एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. या महिलेच्या पतीने अनेकदा अनैतिक संबंध सोडून द्यावे यासाठी आपल्या पत्नीला सांगितले होते. ही माहिती तिने प्रवीण जरदे यांना दिली होती.

त्यामुळे प्रवीण जरदे हे त्यांच्या घरात शिरले आणि फिर्यादी सह त्यांची आई आणि मुलांना शिव्या करत ठार मारण्याची धमकी दिली. यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे. यावेळी त्यांनी कमरेला असलेल्या पिस्तुला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. दरम्यान प्रवीण जरदे हे पोलीस असल्यामुळे फिर्यादी पोलिसात जाण्यास घाबरत होते. अखेर त्यांनी पुढाकार घेऊन पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास (Pune Crime News) सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.