Pune Cime News : लाच प्रकरणी पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज – चोरी झालेली कार परत मिळवून देण्यास मदत (Pune Cime News) करण्यासाठी याच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी ही या प्रकरणी कारवाई करत संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. शशिकांत नारायण पवार असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध नंतर लग्न करण्यास नकार;तरुणावर गुन्हा दाखल

शशिकांत पवार हे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात परीक्षा विधी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. चोरी झालेल्या एका कारचा तक्रार अर्ज त्यांच्याकडे तपासणीसाठी देण्यात आला होता. पवार यांनी संबंधित अर्जदाराकडे अर्जाचा तपास केल्यानंतर वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती कळवली होती.

दरम्यान तक्रार आल्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता शशिकांत पवार यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाच एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर पवार यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन (Pune Cime News) केली आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर केला म्हणून त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.