Pune Cime news: संगमवाडी ब्रिज परिसरात दोन आरोपींकडून लाखो रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

एमपीसी न्यूज- पुणे संगमवाडी  ब्रिज परिसरात दोन इसमांना अंमली पदार्थ विक्री करताना अंमली पदार्थ विरोधी पथक- 1 ने जेरबंद करून त्यांच्याकडून 20.12 लाख रुपये (Pune Cime news) किंमतीचे अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त केला आहे.

 

Aalandi News : नदी स्वच्छता जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

4 जानेवारी 2023 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक- 1 ला माहिती मिळाली  की, पुणे संगमवाडी  ब्रिज परिसरात दोन इसम एमडी या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत.त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफने कारवाई करून त्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. अफजल नदाफ, वय 26 वर्षे, रा. नई जिंदगी गल्ली, सितारा चौक, सोलापुर आणि अर्जुन जाधव, वय 32 वर्षे, रा. संगमवाडी पुणे सध्या रा. वाकसे चाळ, वर्सोली टोल नाक्याजवळ, लोणावळा, पुणे (Pune Cime news) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर  त्यांच्या ताब्यात लाखो रूपये किंमतीचा एमडी हा अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा ऐवज मिळाला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्यांनी एमडी हा अंमली पदार्थ सांताक्रुज,  मुंबई येथून आणला आहे.अधिक तपास अंमली पदार्थ विरोधी पथक- 1 करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.