Pune : विभागीय आयुक्त कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेजसाठी (AFMC) विभागीय आयुक्त कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः रक्तदान केले.

Pune : पोलिस भरती प्रक्रियेसाठी वाहतुकीत तात्पुरता बदल

हे लष्करातील जवान आणि मिलिटरी हॉस्पिटलच्या सहकार्यासाठी आयोजित करण्यात (Pune) आले होते. उपआयुक्त वर्षा लड्डा यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने शिबीर आयोजनात सहकार्य केले. एकूण 101 नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले. उपआयुक्त आर.टी. शिंदे, राजेंद्र मुठे, नयना बोन्दार्डे उपस्थित होते. संयोजक डिफरेन्ट-स्ट्रोक्सचे प्रणल देखणे आणि लीनता देखणे होते. मिलीटरी मेडीकल कॉलेजकडून सुभेदार संजीव आणि मेजर डॉक्टर शाहीन यांच्यासह 12 जवान आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.