Pune : पोलिस भरती प्रक्रियेसाठी वाहतुकीत तात्पुरता बदल

एमपीसी न्यूज : पोलीस भरतीच्या (Pune) प्रक्रियेमुळे चतु:शृंगी वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. पुणे ग्रामीण पोलिस कक्षाची 6 जानेवारी रोजी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी 62,000 उमेदवार येणार आहेत.

Maharashtra Kesari : शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण

सध्या सकाळनगर रोड ते पाषाण रोड (पोलीस मुख्यालयातून जाणारा रस्ता ) असा जाणारा रस्ता हा सार्वजनिक वाहतूकीसाठी वापरण्यात येत आहे. परंतु, या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे पोलीस भरती 2023 प्रक्रियेमध्ये अडथळा होण्याची शक्यता असल्याने सकाळ नगर रोड ते पाषाण रोड (पोलीस मुख्यालयातून जाणारा रस्ता ) या (Pune) दिवशी बंद असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.