Pune news : पुण्यातील पहिले एक्सक्लुझिव्ह ‘इन पर्सन’ होम इंटिरियर कॉन्क्लेव्ह

एमपीसी न्यूज – 12 जानेवारी रोजी पुण्यात पहिल्या एक्सक्लुझिव्ह ‘इन पर्सन’ होम इंटिरियर कॉन्क्लेव्हचे आयोजन केले जात आहे.भारतीय होम इंटिरिअर इंडस्ट्री (Pune News) सातत्याने वाढत आहे. उत्पादकांपासून ते मार्केटिंग, डिझाईनिंग व रिटेलिंगपर्यंतचे विविध भागधारक या वाढीसाठी योगदान देत आहेत.  याच अनुषंगाने क्रिएटिसीटीद्वारे एका अनोख्या नॉलेज शेअरिंग कॉन्क्लेव्हला प्रोत्साहन दिले जात आहे.

‘इन पर्सन’ होम इंटिरियर कॉन्क्लेव्ह हे जवळजवळ 100 प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक ब्रँड्ससह एकाच छताखाली आयोजित केले जाणारे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे होम इंटिरियर सोल्युशन्स डेस्टिनेशन असेल, येथे स्टार्ट टू एंड सोल्यूशन्स सोबतच स्पेस प्लॅनिंग, इंटिरियर डिझाइन, शेवटच्या टप्यातील डिलिव्हरी आणि एक्झिक्यूशन पहावयास मिळेल.

 

Pimpri News: काही  उद्योग  गुजरातला न्या..काही   उत्तरप्रदेशला न्या…कष्टकरी संघर्ष महासंघाचे नेते काशिनाथ नखाते यांचे वक्तव्य

या सर्व संबंधित विषयांसाठी एका खास व्यासपीठावर (Pune News)चर्चा करणे महत्त्वाचे होते आणि  होम आणि होम प्लस कॉन्क्लेव्हच्या या पहिल्या एडिशनमध्ये या क्षेत्रांशी  संबंधित विषयांवर खास संभाषणांचे आयोजन केले जाईल.

 

क्रिएटिसीटीद्वारे या कॉन्क्लेव्हला प्रोत्साहन दिले जात असुन 12 जानेवारी 2023 रोजी रिट्झ कार्लटन, एअरपोर्ट रोड, पुणे येथे याचे आयोजन होणार आहे. संबंधित उद्योगातील  300  प्रतिनिधींच्या मर्यादित व जाणकार उपस्थीतांसह आयोजित केले जाणारे हे  खास आणि अनोखे कॉन्क्लेव्ह असेल. या कॉन्क्लेव्हमध्ये (Pune News)सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.