Pune Crime News : पुण्यात अमंलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या मास्टर माईंड महिला आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी देणाऱ्या मुंबईतील (Pune Crime News) मास्टर माईंड महिला आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई येथून अटक केली आहे.जेलुखा मोहम्मद हुसेन कुरेशी उर्फ जुलैखाबी उर्फ जिल्लो (वय 40 रा. अंधेरी, मुंबई) असे अटक महिलेचे नाव असून तिच्यावर मागील पाच वर्षापासून मोक्का अंतर्गत कारवाई पोलिसांनी केली होती मात्र ती फरार होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आयुक्तालयाच्या अमंली पदार्थ विरोधी पथक एक च्या पथकाने गुरुवारी (दि.5) संगमवाडी येथील ब्रीज परिसरातून अफझल नदाफ व अर्जून विष्णू जाधव या दोन आरोपींना एम.डी. मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करताना (Pune Crime News)अटक केले.यावेळी त्यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला असता अर्जून हा सहा महिन्यापूर्वी मोक्कातून जामिनावर सुटला होता. तसेच अफझल याने अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले होते.

Pimpri News : स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःचे संशोधन विकास केंद्र गरजेचे-डॉ. प्रमोद चौधरी

दोघांनाही या अंमलीपदार्थाचा पुरवठा जुलैखाबी ही मुंबईतून करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. यावेळी पोलीस अंमलदार मारूती पारधी व मनोज कुमार साळुंके यांना खबर मिळाली की सदर महिला ही मुंबईतील सांताक्रुज येथे राहते. पोलिसांनी मुंबई येथे जाऊन मोठ्या शितापीने अटक केले.जुलैखाबी ही रेकॉर्डवरील आरोपी असून तिच्या विरोधत अंमलीपदार्थ विरोधी गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. पुणे पोलिसांनीही तिच्यावर खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिला न्यायालयासमोर हजर केले असता 9 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी (Pune Crime News)सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.