Talegaon Dabhade News : शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श विद्या मंदिरच्या मुलांनी दाखवला आदर्श

एमपीसी न्युज – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021- 2022 चा निकाल आला असून यामध्ये आदर्श विद्या मंदिरातील एकूण 5 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर विशेष प्राविण्य (Talegaon Dabhade News) मिळविले. तसेच एनएमएसएस आणि सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता आठवीतील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन अद्वितीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात एक मानाचा तुरा रोवला आहे.
 ऋग्वेद रघुनाथ गावडे हा मावळ तालुका शहरी विभागातून तृतीय तर जिल्ह्यातून 248 व्या क्रमांकाचा मानकरी ठरला , श्रीशा मनोज पवार तालुक्यात सातव्या क्रमांकाने यशस्वी होऊन तिने जिल्हास्तरावर 339 वा क्रमांक संपादित केला ,शौर्या दामोदर गदादे मावळ तालुक्यात आठव्या क्रमांकाने तर जिल्हास्तरीय 340 व्या  क्रमांकाने यशस्वी झाली आहे.तन्मय किशोर गुरव मावळ तालुका स्तरावर नवव्या तर जिल्हा स्तरावर 357 व्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे .
अर्णव तुषार सलागरे मावळ तालुक्यात अकरावा व जिल्हास्तरीय 465 वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच इयत्ता 8 वी साठी घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आयोजित एन एम एम एस परीक्षेत अथर्व संजय खराडे, अथर्व एकनाथ भोमाळे यांनी तर सारथी शिष्यवृत्ती योजनेमध्ये गौरी नरोत्तम पाटील ,प्रतिक संजय लांबकाने या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून प्राविण्य मिळवून तळेगाव तसेच मावळ तालुक्यात व जिल्हा स्तरावर  विद्यालयास नेत्र दीपक असे यश मिळवून दिले त्याबद्दल मावळ  शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे,सहसचिव प्रा. वसंत पवार,  तसेच शाळेचे मुख्याध्यापक (Talegaon Dabhade News) प्रकाश शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक प्रतीक्षा ढवळे, राजश्री बनसोडे, सुजाता डावखरे, प्रमोद गोसावी तसेच एन.एम. एस. एस .परीक्षा मार्गदर्शक शिक्षक स्वाती शिंदे व कीर्ती मोहरीर यांचे अभिनंदन केले. मुलांच्या यशात शिक्षकांचे  योगदान मोलाचे असून पालकांनीही आपल्या मनोगतातून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांच्या यशाबद्दल कौतुक करून पालक व शिक्षक यांनी घेतलेली मेहनतच कामी आली असे गौरवोद्गार काढले.तसेच यातून शाळेतील सर्व शिक्षकांची एकी दिसून येत असून ही बाब भविष्यात शाळेच्या गुणवत्ता वाढीस नक्कीच फायद्याची ठरेल.यासाठी त्यांनी सर्व शिक्षक वृंदांस शुभेच्छाही दिल्या.
संस्थेचे सहसचिव प्रा.वसंत पवार यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वाटचालीत यशाची परंपरा अशीच वृध्दींगत होवो,यशाची कमान विस्तारत जावो असे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी विद्यार्थी आणि  शिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे (Talegaon Dabhade News) अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा ढवळे यांनी केले तर  राजश्री बनसोडे यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.