Pune : ‘दाभोलकर-पानसरे हत्या – तपासतील रहस्ये?’ पुस्तक प्रकाशित

एमपीसी न्यूज – दाभोलकर, पानसरे यांची हत्या हा (Pune) विषय वेगळ्या दृष्टीकोनातून मांडणारे ‘दाभोलकर-पानसरे हत्या – तपासतील रहस्ये?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

गरवारे महाविद्यालया जवळील ‘कोहिनुर मंगल कार्यालय’ पुणे येथे 8 ऑक्टोबर रोजी हा प्रकाशन सोहळा पार पडला. शल्य चिकित्सक डॉ. अमित थढानी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन अधिवक्ता भरत देशमुख, मुंबई उच्च न्यायालयातील फौजदारी अधिवक्त्या सुवर्णा आव्हाड, पुस्तकाचे लेखक डॉ.अमित थढानी, तसेच ज्येष्ठ लेखक आणि गीता विवेक ग्रंथ कर्ते विवेक सिन्नरकर आदी उपस्थित होते.

Bjp : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर

आपला विवेक जागृत ठेवून सत्याला साथ देत आपण सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे आवाहन विवेक सिन्नरकर यांनी (Pune) यावेळी केले. या कार्यक्रमाला 200 हून अधिक जणांची उपस्थिती लाभली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.